फुलंब्री: कोलठाणवाडी शिवारात पोलिसांकडून लाखो रुपयांचा गांजा जप्त
फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीमध्ये असणाऱ्या कोलठाणवाडी शिवारामध्ये फुलंब्री पोलिसांनी लाखो रुपयांचा गांजा जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली टाकण्यात आलेल्या पथकाने सदरील कारवाई केली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.