शहरातील गवराळा येथील श्री सुरृयमुखी हनुमान मंदिरात अखंड हरीनाम श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. यानिमित्ताने मंदिरात दररोज किर्तन तथा अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २० डिसेंबरला भव्य दिंडी सोहळ्यानंतर या सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे.