लातूर: लातुरात जन सुरक्षा कायद्याला कडाडून विरोध महात्मा गांधी चौकात कृती समितीचा धरणे सत्याग्रह,विविध संघटनाचा मोठा सहभाग
Latur, Latur | Sep 17, 2025 लातूर : गेल्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने सर्व विरोधी पक्ष व संघटनांना नेस्तनाबूत करण्यासाठी "जन सुरक्षा कायदा” मंजूर केला आहे.हा कायदा अतिशय घातक स्वरूपाचा असून जन सामान्यांना संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणार आहे. या जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात आज 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिनी जन सुरक्षा कायदा विरोधी कृती समिती लातूर जिल्ह्याच्या वतीने लातूर येथे महात्मा गांधी चौकात सकाळी 11 ते सायं. 4 वाजेपर्यंत धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आला.