ठाणे: दिवा येथे इमारतीचा काही भाग कोसळला, अडकलेल्या दहा रहिवाशांची अथक प्रयत्नानंतर सुखरूप सुटका
Thane, Thane | Sep 15, 2025 दिवा परिसराच्या गावदेवी मंदिर जवळ संजय म्हात्रे चाळीतील एका पंधरा ते वीस वर्षे जुने बांधकाम असलेल्या पहिल्या लग्नाच्या गॅलरीचा काही भाग कोसळल्याची घटना मध्यरात्री घडली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्ष, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता घटनास्थळी दाखल झाले आणि पहिल्या मजल्यावरील तीन घरात अडकलेल्या दहा व्यक्तींची अथक प्रयत्नानंतर सुखरूप सुटका केली. इतर 30 घरे देखील कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने रिकामी करून रहिवाशांच्या इतरत्र स्थलांतर केले.