जालना: गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मातंग समाजाने काढला एससी प्रवर्गामध्ये अबकड वर्गीकरणाच्या मागणीसाठी मोर्चा
Jalna, Jalna | Aug 31, 2026 आज दिनांक 31 ऑगस्ट 2026 वार सोमवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना शहरातील गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मातंग समाजाच्या जिल्हाभरातील हजाराच्या संख्येने समाज बांधवांनी हातात पिवळे ध्वज घेत महापुरुषांचे फोटो हातात घेत एससी प्रवर्गामध्ये सरकारने तात्काळ अबकड वर्गीकरण कराव, जेणेकरून मातंग समाजाचा विकास होईल या मागणीसाठी हा मोर्चा काढला या मोर्चात मार्गदर्शन करण्यासाठी मातंग समाजाचे नेते सचिन भाऊ साठे यांच्यासह इतर नेते सुद्धा उपस्थित झाले होते.