सेलू: धपकी शिवारात ताश पत्त्यावर जुगार खेळणाऱ्या 5 जणांना सेलू पोलिसांनी केली अटक; ₹49200 ची रोख रक्कम जप्त
Seloo, Wardha | Oct 22, 2024 ताश पत्त्याच्या बावन्न पत्त्यावर पैसे लावून हारजीतचा जुगार खेळणाऱ्या 5 आरोपींना सेलू पोलिसांनी धाड टाकून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 49 हजार 200 ची रोख जप्त करण्यात आली. ही कारवाई ता. 21 सोमवारी सायंकाळी 7.30 वाजताचे सुमारास मौजा धपकी शिवारात कोटंबा रोडवर करण्यात आली. याप्रकरणी रात्री 11 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला. अशी माहिती ता. 22 मंगळवारला सेलू पोलिसांनी दिली.