भोकरदन: शासनाची लाखोंची फसवणूक प्रकरणी नवनाथ दौड पोलिसांच्या ताब्यात,सहा. पो. नि. संतोष माने यांनी पारध येथे दिली माहिती
आज दि.16 जुलै रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन ता.पारध पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी माहिती दिली की,21/6/ 2025 रोजी पारध पोलीस ठाणे येथे जिल्हा पणन अधिकारी विजय राठोडव यांनी तक्रार दिली होती की नाफेड सेंटर येथे खोटे सातबारे दाखवून नवनाथ दौड व भागवत दौड आणि इतर 8 जणांनी शासनाची लाखोंची फसवणूक केली होती, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि 15 जुलै रोजी नवनाथ दौड ला ताब्यात घेऊन त्याला आज न्यायालयात हजर केले आहे अशी माहिती त्यांनी दिली.