मुर्तीजापूर: मुर्तिजापूर नगरपालिका निवडणुकीत दोन दिवसांत 11 माघारी, लढत अनिश्चिततेकडे
मुर्तिजापूर नगरपालिका निवडणूक 2025 मध्ये दोन दिवसांत तब्बल 11 उमेदवारांनी माघार घेतल्याने राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. नगरसेवक पदाचे 10 आणि थेट अध्यक्ष पदाचा 1 उमेदवार मागे सरकल्याने अनेक प्रभागांत लढत एकतर्फी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माघारीची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर असल्याने आणखी काही जण माघार घेऊ शकतात, अशी चर्चा आहे. सुरू असलेल्या गाठीभेटी, पक्षांतर्गत चर्चा आणि बदलत्या रणनीतीमुळे राजकीय वातावरण तणावपूर्ण बनले आहे. उद्या जाहीर होणाऱ्या अंतिम यादीनेच वास्तविक चित्र स्