नागपूर शहर: विनयभंग करणाऱ्या विकृताला प्रताप नगर पोलिसांकडून बेड्या; १० गुन्हे उघड
महिलांची छेड काढणाऱ्या आणि विनयभंग करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला प्रताप नगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या अटकेमुळे शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत असलेले तब्बल १० गुन्हे उघडकीस आले आहेत. २४ मार्च २०२६ रोजी रात्री एक २५ वर्षीय महिला आपल्या मैत्रिणीसह वाढदिवस आटोपून दुचाकीने घरी परतत होती. खामला मटन मार्केट चौकाजवळ एका अज्ञात दुचाकीस्वाराने तिचा पाठलाग करून अश्लील वर्तन केले आणि विनयभंग केला.