उरण: उमरोळी पालघर येथून घरफोडी प्रकरणातील पती-पत्नी आरोपी उरण पोलिसांच्या जाळ्यात
Uran, Raigad | Aug 26, 2025 उरण तालुक्यातील दादरपाडा परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणातील आरोपी पती-पत्नीला उमरोळी पालघर येथून पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत गजाआड केले. या गुन्ह्यात सुमारे १३ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे आरोपींकडून तब्बल १४ लाख ५४ हजार ९२८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.