नागपूर शहर: दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणाला मारहाण; लुटले २ हजार,आरोपी अटक : संजय मेंढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी 4 जूनला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,तहसील पोलीस ठाणे अंतर्गत परिसरात दारूसाठी पैसे न दिल्याने एका तरुणाला मारहाण करून २,००० रुपये लुटल्याची घटना घडली. आरोपींनी पीडित तरुणाला चाकूने वार करण्याची धमकीही दिली होती. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मोहम्मद आतिक या आरोपीला अटक केली आहे. त्याने आपला साथीदार मोहम्मद सबील अंसारी याच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. याबद्दलची अधिक