कर्जत: कर्जत-खालापूर मतदारसंघाच्या समृद्धीसाठी देवीकडे साकडे – आमदार महेंद्र थोरवे
Karjat, Raigad | Oct 1, 2025 नवरात्र उत्सवाची धामधूम सर्वत्र रंगलेली असताना आज दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८ च्या सुमारास आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत शहरासह मतदारसंघातील विविध देवस्थानांना भेट देत देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मतदारसंघाच्या समृद्धीसाठी तसेच नारी सशक्तीकरणासाठी देवीसमोर साकडे घातले. आज कर्जत शहरातील भिसेगाव येथील अंबेमाता मंदिर, गुंडगे येथील सोमजाई माता मंदिर, कर्जतमधील वेदमाता मंदिर आणि वेणगाव येथील महालक्ष्मी मंदिर येथे आमदारांनी दर्शन घेतले. देवस्थानांच्या विकास कामांचा आढावा घेतला.