जालना: पोलिसांनी जप्त केली 63 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त; तहसीलदाराकडून मात्र कारवाई नाही; चर्चेला उधान
Jalna, Jalna | Jul 6, 2026 रेतीच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीविरोधात मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांनी 12 जून रोजी मौजे खोरवड येथील पूर्णा नदीपात्र परिसरात विशेष मोहिम राबवत तब्बल 63 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून रेती माफियांना मोठा दणका दिला. सोमवार दि. 6 जुलै 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या धडक कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असताना महसूल विभागाने मात्र, त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या जप्त वाहनांवर महसूल विभाग काय कारवाई करते हे पहावे लागणार आहे.