कल्याण: आधारवाडी येथे आढळली कोब्रा जातीच्या सापाची जोडी
Kalyan, Thane | Nov 8, 2025 कल्याणच्या आधारवाडी परिसरामध्ये कोब्रा जातीच्या सापाची जोडी असल्याची माहिती सर्पमित्रांना मिळाली. माहिती मिळतात सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले आणि कोब्रा जातीच्या दोन्ही सापाला सुखरूप रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. पाच ते साडे पाच फूट लांबीचे हेच साप असल्याचे सांगितले जात आहे मात्र अचानक दोन साप आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सापाला रेस्क्यू केल्या नंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.