सोमवारी १२ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता पिंप्राळा परिसरातून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रचंड मशाल यात्रा निघाली. यात पक्षाचे उमेदवार आणि समर्थकांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते. ढोल-ताशांचा गजर आणि जयघोषामुळे परिसर दुमदुमल्याचे दिसून आले. पक्षाचे नेते कुलभूषण पाटील व मयूर कापसे यांच्यासह उमेदवारांना यात जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळाला.