नागपूर शहर: धक्कादायक: लक्ष्मी भवन चौकात तरुणाची चाकू भोसकून हत्या; बारावीतील 'मेरिट' विद्यार्थी निघाला खुनी
अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांनी 11 मे ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लक्ष्मी भवन चौकात रात्री ३ वाजेच्या सुमारास एका २० वर्षीय तरुणाची क्षुल्लक वादातून हत्या करण्यात आली. तुषार सुधीर चुटे असे मृत तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तुषार आपल्या मित्रांसोबत आईस गोला खाण्यासाठी लक्ष्मी भवन चौकात गेला होता. तिथे दोन तरुणांशी झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या वादादरम्यान आरोपींनी तुषारच्या पाठ