हवेली: पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता.हवेली) येथे महानगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणा-या वाहनातून सांडला कचरा
Haveli, Pune | Oct 29, 2025 पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कस्तुरी मंगलकार्यालयाजवळ असलेल्या गतीरोधकावर महानगरपालिकेच्या कचरा वाहकरणाऱ्या गाड्यातून कचरा थेट महामार्गावर सांडत आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे महामार्गाच्या बाजूला नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.सांडलेल्या कचऱ्यावरून दुचाकी गाडी घसरून दुचाकी चालकाला अपघाताला सामोरे जावे लागले आहे. रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे परिसर अस्वच्छ झालाच आहे.