नागपूर शहर: प्रेयसीशी बोलल्याच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला; मुख्य आरोपीसह चौघे गजाआड: संजय मेंढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी 9 मे ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मस्कासाथ परिसरात प्रेयसीशी बोलण्याच्या वादातून आवेश खान नावाच्या तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सुरेंद्र होले याच्यासह गन्या कोराटकर, सक्षम मौदेकर आणि विनीत कोराटकर या चौघांना तात्काळ अटक केली आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे.