मेळघाट परिसरातील धामणगाव गढी येथून आदर्श गाव देवगाव ते खोंगडा या मार्गावरील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप होत असून,याबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.सदर रस्त्याचे काम पुन्हा उकरून उत्कृष्ट दर्जाचे करून द्यावे,अन्यथा निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदार व संबंधित अभियंत्यावर तातडीने कारवाई करावी,अशी ठाम मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेव पवार व ग्रामस्थांनी आज सकाळी १०:३० वाजता प्रशासनाकडे केली आहे.