नागपूर शहर: थरारक अपघात! राणी दुर्गावती चौकात भरधाव बोलेरोची धडक; महिलेचा जागीच मृत्यू, बघा वायरल विडिओ
शहरातील वर्दळीच्या राणी दुर्गावती चौकात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका भरधाव बोलेरो गाडीने दिलेल्या भीषण धडकेत एका महिलेचा दुर्दैवी अंत झाला. या अपघाताचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला केशरीबाई तोंडीलाल शरणागत आणि त्यांचे पती 'बँक ऑफ बडोदा' येथून पैसे काढून आपल्या दुचाकीने घराकडे निघाले होते.