लातूर: गिरीश पाटील यांचा भाजपात प्रवेश; लातूर महानगर निवडणुकीचा श्रीगणेश, कैलास निवासस्थानी सत्कार
Latur, Latur | Nov 2, 2025 लातूर राजकारणातील एक महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि माजी बांधकाम सभापती गिरीश पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख, सर्वसमावेशक आणि जनकल्याणकारी नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपाचा झेंडा हातात घेतला.या निमित्ताने भारतीय जनता पक्ष लातूर शहर जिल्ह्याच्या वतीनेआज सकाळीच 11 वाजता कैलास निवास येथे गिरीश पाटील यांचा सत्कार सोहळा पार पडला.