नागपूर शहर: फुटाळा परिसरात खून करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने घेतले ताब्यात : शुभांगी देशमुख पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी 30 जूनला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार फुटाळा परिसरात शुल्लक कारणावरून वाद होत एका युवकाचा निर्घृण खून करणाऱ्या दोन आरोपींना अवघ्या काही तासातच गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहे आरोपींना पुढील कारवाईसाठी गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी दिली आहे