औंढा नागनाथ: पोलिसाच्या विशेष पथकाची ढेगज, सुकापुर शिवारात अवैध देशी दारू विक्रीवर कारवाई
औंढा नागनाथ तालुक्यातील ढेगज तसेच सुकापुर शिवारात अवैध देशी दारू विक्रीवर हिंगोली ग्रामीण उपविभागाच्या विशेष पथकाने दिनांक १२ ऑक्टोबर रविवार रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास कारवाई करून अवैध देशी दारू च्या २४ बॉटल किंमत १८२० रुपये असा मुद्देमाल जप्त करून पोलीस शिपाई अंकुश कल्याणकर यांच्या फिर्यादीवरून त्रिक्षण इंगोले सह अन्य एकावर रात्री अकरा वाजे दरम्यान औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असल्याची माहिती दिनांक १३ ऑक्टोबर सोमवार रोजी सायंकाळी सहा वाजता प्राप्त आहे