नागपूर शहर: गंगा जमुना परिसरात चाकू घेऊन फिरत असलेल्या आरोपीला अटक
26 एप्रिल ला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार लकडगंज पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गंगा जमुना परिसरात चाकू घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव जुनेद खान असे सांगण्यात आले असून त्याच्याकडून एक धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे. चाकू ची किंमत दोनशे रुपये सांगण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.