महागाव काळी दौ. परिक्षेत्रातील गुंज वर्तुळ अंतर्गत कक्ष क्र. ३३४ मध्ये राखीव वन परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसावर वनविभागाने धडक कारवाई केली. दि. १२ जानेवारी रोजी रात्री २ वाजताच्या दरम्यान जंगलात प्रवेश करून रेती तस्कर शिप नदी पात्रातील वाळूचा उपसा करून ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे वाहतूक करत असताना वनविभागाच्या पथकाने तस्कराना रंगेहाथ पकडले. या कारवाईदरम्यान १ ट्रॅक्टर, २ ट्रॉली व १ ब्रास रेती असा एकूण अंदाजे ५ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.