लातूर: भामरी चौकात विजेच्या शॉकने मावळले प्राण,प्रेत आणले एमआयडीसी पोलीस ठाण्यात, गुन्हा नोंद न झाल्याने नातेवाईकाचा आक्रोश
Latur, Latur | Sep 14, 2025 लातूर – शहरालगत सिकंदरपूर येथील सुरेश गोरख कसबे (वय 52) हे भामरी चौकात धाब्याच्या बांधकामाला अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी झाडावर चढले असताना विद्युत तारा फांदयात अडकल्या तेव्हा झाडाच्या फांद्या तोडत असताना सुरेश कसबे यांना 25 मे रोजी घटनेत त्यांना गंभीर विजेचा शॉक बसला होता. तब्बल तीन महिन्यांच्या उपचारांनंतर अखेर रविवारी (दि.14 सप्टेंबर) पहाटे त्यांचा मृत्यू झाला.