नागपूर शहर: नोटांच्या बंडलची अफलातून 'फसवणूक' करणाऱ्या टोळीला बेड्या, 50 हजारांच्या बदल्यात दाखविले होते दोन लाखाचे आमिष
नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रंमाक ५ ने ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी ५० हजार रुपयांच्या बदल्यात दोन लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करत होती.आरोपींनी 'बीलाल इन्टरप्राईजेस', हसनबाग, नंदनवन येथे ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल तयार केले होते. या बंडलच्या वरच्या आणि खालच्या बाजूला खऱ्या नोटा लावून आतमध्ये कोरे कागद ठेवले होत.