जालना: एलपीजी गॅसचा तुटवडा; पुरवठा सुरळीत न झाल्यास ऑटो रिक्षा चालक-मालकांचा चक्का जाम आंदोलनाचा इशारा
Jalna, Jalna | Apr 1, 2026 आज दिनांक एक एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील ऑटो रिक्षा चालक-मालकांच्या विविध मागण्यांसंदर्भात मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना, संयुक्त कृती समिती महाराष्ट्र (शाखा : जालना) यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी तथा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. एलपीजी गॅसचा नियमित पुरवठा होत नसल्याने आणि रिक्षा व्यवसाय गंभीर अडचणीत आल्याने मागण्या तातडीने मान्य न झाल्यास बेमुदत रिक्षा बंद व चक्का जाम