झरी जामणी: पैसे मागितल्याचे कारणावरून एकास केली मारहाण; गणेशपुर बस स्टॉप येथील घटना
पैसे जमा करण्यास सांगितले असता आरोपीने गैर कायद्याची मंडळी जमून फिर्यादीस मारहाण केली ही घटना गणेशपूर बस स्टॉप येथे दिनांक 25 मे रोजी रात्री घडली. याप्रकरणी विकास सिंग श्रीहरी किसन सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी आरोपी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.