कुपटा येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
993 views | Manora, Washim | Sep 28, 2025 वाशिम (दि.२६,सप्टेंबर): मानोरा तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चापे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.आ. केंद्र कुपटा येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभांगी जाधव, डॉ.रविंद्र कव्हर व डॉ.रमा राठोड यांनी योग्य नियोजन करून लाभार्थ्यांची तपासणी केली. यावेळी आरोग्य निरीक्षक श्रीरंग कानडे, उमेश सुर्वे, आरोग्य सहाय्यिका सविता पवार, गटप्रवर्तक, आशा सेविका, परिचर, चालक व इतर कर्मचारी उपस्थित होते.