लातूर: अतिवृष्टीने पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान; आमदार अमित देशमुख यांची सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी
Latur, Latur | Oct 29, 2025 पावसाळा संपला तरी अतिवृष्टीचे संकट शेतकऱ्यांची पाठ सोडताना दिसत नाही. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने लातूर जिल्ह्यात, खरीप पिकांबरोबरच रबी पेरणीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. पुन्हा नदी नाल्यांना पूर येऊन, नदीकाठची उरली-सुरली खरीप पिके व शेती अवजारे वाहून गेली आहेत.