नागपूर शहर: नागपुरात चैन स्नॅचर जेरबंद;लाखोचा मुद्देमाल जप्त
20 जूनला दुपारी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूर गुन्हे शाखेच्या 'चेन स्नेचिंग विरोधी पथकाने' एका चेन स्नॅचरला अटक केली आहे. मनोज प्रभू बुरडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने ९ जून रोजी सीताबर्डी भागात एका महिलेची सोन्याची चेन चोरली होती. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपीला अटक करून त्याच्याकडून २० ग्रॅम सोन्याची चेन, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिव्हा जप्त केली आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी सीताबर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.