मोर्शी: धामणगाव ते काटपुर जवळ असलेल्या गांधी विद्यालयाजवळुन, अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर शिरखेड पोलिसांनी केला जप्त
शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार ईश्वर वर्गे आपल्या पथकासह पेट्रोलिंग करीत असताना, धामणगाव ते काटपुर जवळ असलेल्या गांधी विद्यालया जवळील कोशी नदीतून अवैध रेती वाहतूक होत असल्याचे पोलिसांना आढळून आले. रेती वाहतुकीचा कुठल्याही प्रकारचा परवाना वाहन चालका जवळ नसल्याने, शिरखेड पोलिसांनी पंचा समक्ष मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त करून दिनांक दहा नोव्हेंबर रोजी एक वाजून बावीस मिनिटांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे