तुमसर: मिटेवाणी येथे विनापरवाना मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल पथकाची कारवाई,5 लाख 5 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त
तुमसर तालुक्यातील मिटेवाणी येथे दि. 31 ऑक्टोंबरला महसूल पथकाचे मंडळ अधिकारी कु. पी.जे. मेश्राम हे आपल्या पथकासह गौण खनिज संबंधी आळा घालण्यासाठी पेट्रोलिंगवर असताना त्यांना ट्रॅक्टर क्र.MH 36 Z 8858 यात विनापरवाना 1 ब्रास मुरूम वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.यावेळी सदर ट्रॅक्टर व एक ब्रास मुरूम तहसील कार्यालयात डिटेन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार तुमसर यांच्या आदेशाने दि.7 नोव्हेंबर रोज शुक्रवारला दुपारी 12 वा. ट्रॅक्टर चालक मालक विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.