लातूर : शहरातील रिंग रोडवरील रेल्वे स्टेशन चौकाच्या परिसरात आज रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास एका मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलवरील तरुणा गंभीर जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना व रुग्णवाहिकेला कळवले. त्यानंतर अपघातग्रस्ताला विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले.