कर्जत: कर्जत शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद
नगरपरिषद प्रशासन ढीम्म
Karjat, Raigad | Sep 30, 2025 कर्जत शहरात नगरपरिषद मध्ये प्रशासकीय राजवट असल्याने सर्व कामे अधिकारी वर्ग पाहत असून अधिकारी वर्गाचा अंकुश नाही. त्यामुळे शहराचे नियोजन बिघडले असून शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्चांद मांडला असून पालिकेकडे त्या कुत्र्यांच अटकाव करण्याचे कोणतेही नियोजन नाही. दरम्यान,कुत्रे बघून शहरातील नागरिक भीतीने पळ काढत आहेत तर कुत्रे चावतील म्हणून जेष्ठ नागरिक घराबाहेर पडत नाहीत.