तळा: तळा शहराची पाणी समस्या कायम नळातून गढूळ पाणीपुरवठा
Tala, Raigad | Jun 19, 2026 तळा शहरातील अनेक ठिकाणी नागरिकांच्या नळाला गढूळ पाणी येत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात काही भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून भर उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे. तर काही ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते पाणी खाजगी पाणी विक्रेत्यांकडून विकत घेत आहेत. अंबेळी व तहसिल शेजारील धरण या दोन ठिकाणी असलेल्या नगरपंचायतीच्या बोरिंगच्या माध्यमातून तळा शहराला पाणी पुरवठा केला जातो.