करवीर: कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सवात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे व कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा - जिल्हाधिकारी अमोल येडगे
दसरा चौकात कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सवाला दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी शुभारंभ होत असून या दसरा महोत्सवाला सर्व नागरिकांनी सहभागी होऊन या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज माध्यमांशी बोलताना केले आहे.