उरण: उलवेत दुर्मिळ 42 मुनिया पक्षी जप्त; तस्करांना कोठडी
Uran, Raigad | Aug 26, 2025 उरण वनविभागाने उलवे नोड परिसरात मोठी धाड टाकत दुर्मिळ पक्ष्यांच्या तस्करीचा पर्दाफाश केला. रेड मुनिया, स्कॅली मुनिया आणि ट्रायकलर मुनिया या मौल्यवान प्रजातींचेतब्बल 42 पक्षी जप्त करण्यात आले. याप्रकरणी देवेंद्र लालचंद पाटील (रा. कोपरखैरणे) आणि हरेश दामोदर पाटील (रा. पेण) या दोन तस्करांना अटक करून पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची कोठडी सुनावली.