नागपूर शहर: नागपुरात ई-रिक्षा चोरणारा जेरबंद; गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाची कारवाई
31 मे ला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ई-रिक्षा चोरणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली आहे. धीरेंद्र उर्फ बुल्ली काशिनाथ गणवीर असे आरोपीचे नाव आहे.मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख रुपये किमतीची ई-रिक्षा जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सक्करदरा पोलीस ठाण्यातील गुन्हा दाखल करण्यात आली असून, पुढील तपासासाठी आरोपीला सक्करदरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात