तुमसर तालुक्यातील आग्री येथे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती तुमसर पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी दि. ५ नोव्हेंबर रोजी धाड घातली असता आरोपी राजकुमार मेश्राम वय ४० वर्षे रा. आग्री याच्या ताब्यातून ५० लिटर मोह फुलाची हातभट्टी दारू एकूण किंमत १० हजार रुपयांच्या मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरच्या गुन्हा तुमसर पोलिसांनी तपासात घेतला आहे.