साकळी या गावात सर्व धर्मीयांची श्रद्धा असलेले हजरत सजनशहावली रहमतुल्लाहे यांची दरगाह आहे. सालाबाद प्रमाणे येथे सोमवारी मोठ्या उत्साहात संदल शरीफ काढण्यात आले. सहवाद्य निघालेली मिरवणूक लक्षवेधी ठरली होती. ही मिरवणूक दर्गाह वर दाखल झाल्यानंतर संदल उत्साहात चढवण्यात आले महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तर येथे आता मंगळवारी कव्वालीचा मुकाबला रंगणार आहे.