अलिबाग: १ कोटी १० लाखाहून अधिक लाभार्थी भगिनींची इ–केवायसी प्रक्रिया पूर्ण – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
Alibag, Raigad | Oct 16, 2025 अवघ्या १५ दिवसांत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जवळपास १ कोटी १० लाखाहून अधिक लाभार्थी भगिनींची इ–केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अजूनही दीड महिन्याचा कालावधी बाकी असून अतिवृष्टीने ग्रस्त भागातील महिलांसाठी १५ दिवसांचा अतिरिक्त कालावधी वाढवून देण्यात येणार आहे. अशी प्रतिक्रिया आज गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.