नागपूर शहर: नागपूरमध्ये ई-रिक्शा चालकांचा धक्कादायक प्रकार; स्ट्रीट लाईटच्या पोलवरून सुरू आहे सर्रास वीज चोरी, मृत्यूला निमंत्रण
नागपूर शहरातून वीज चोरीचा एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. शहरात काही ई-रिक्शा चालकांकडून सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर करत वीज चोरी केली जात असल्याचे उघड झाले आहे.शहरातील काही ई-रिक्शा चालक रस्त्याच्या कडेला असलेल्या पथदिव्यांच्या खांबांमधून अनधिकृतपणे वीज कनेक्शन घेत आहेत. या बेकायदेशीर जोडणीचा वापर करून ते त्यांच्या ई-रिक्शाच्या बॅटरी चार्ज करत असल्याचे दिसून आले आहे.