जालना: जालन्यात श्री समर्थ हनुमान मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने फोडली; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Jalna, Jalna | Apr 5, 2026 आज दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात श्री समर्थ हनुमान मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने फोडल्याचा घटना समोर आलीय. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आरोपीला एका तासात पोलिसांनी जेरबंद केलंय. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केलीय. या कारवाईत 1 हजार 332 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जालना शहरातील मंमादेवी मगर, अंबड रोड येथील श्री समर्थ हनुमान मंदिरात अज्ञात इसमाने प्रवेश करून मंदिरातील स्टीलच्या दानपेटीचे कुल