नागपूर शहर: कोराडीत थरार: किरकोळ वादातून तरुणाची दगडाने व चाकूने ठेचून निर्घृण हत्या: विनोद मटारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक
कोराडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद मटारे यांनी 20 मेला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारत फर्निचर परिसरात एका किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्याकांडात झाले आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून काही टोळक्यांनी एका तरुणावर दगड, चाकू आणि काठ्यांनी हल्ला करत त्याची निर्घृण हत्या केली. या हल्ल्यात मृतकाचा मित्रही गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले असून फरार आर