औंढा नागनाथ: वसमत मार्गावर काठोडा चोंडीजवळ कार दुचाकीच्या भीषण अपघातात नांदेड जिल्ह्यातील दोन ठार, तीन गंभीर जखमी
औंढा नागनाथ ते वसमत मार्गावर काठोडा चोंडी जवळ कार क्र.एमएच १२ एनई ३८०३ व दुचाकी क्र. एमएच २६ झेड २००७ च्या भीषण अपघातात दुचाकी वरील दोघेजण जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक सहा ऑक्टोबर सोमवार रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास घडली. शेख एजाज,नूरजहाँ बेगम हे दोघेजण जागीच ठार झाले तर अनाबिया बेगम यांच्यासह कार मधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत