सेलू: स्केच केलेल्या आरोपीची माहिती द्या; सेलू पोलीसांचे आवाहन
Sailu, Parbhani | Oct 26, 2025 स्केच केलेल्या आरोपीची माहिती द्या; सेलू पोलीसांचे आवाहन शहरातील सेलू पोलीस ठाणे अंतर्गत गुरनं ५२६/२०२५कलम १०३/१,३११,३०९/६,३/५भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणी पोलीसांनी स्केच केलेल्या आरोपींची माहिती देण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी केले आहे. संबंधित स्केच केलेल्या आरोपीची माहिती सांगणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येऊन त्यांचे नाव ही गुपित ठेवण्यात येणार आहेत.असे आवाहन पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.