नागपूर शहर: पाचपावली पोलिसांकडून कुख्यात वाहन चोराला अटक; दोन दुचाकी जप्त : अनिरुद्ध पुरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांनी 16 जूनला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार पाचपावली पोलिसांनी एका कुख्यात वाहन चोराला अटक करण्यात यश मिळवले आहे. सुशांत दामोदर अंबादे असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या असून, जप्त करण्यात आलेल्या गाड्यांची एकूण किंमत ५५,००० रुपये इतकी आहे. आरोपी सुशांत अंबादे याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.