अकोट नगरपालिका निवडणुकीत ३३ नगरसेवक पदांसाठी मतमोजणीत पार पडली यामध्ये भाजप सर्वाधिक ११ जागा पटकावत सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आला तर भाजप पाठोपाठ काँग्रेस ६ तर एम आय एम ५ प्रहार ३ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार २ उबाठा २ वंचित बहुजन आघाडी २ राष्ट्रवादी शरद पवार १ शिवसेना १ आदी नगरसेवक निवडून आले. अकोट नगरपालिकेतील एकूण 33 नगरसेवकांच्या विजयाच्या घोषणा झाल्या यावेळी विजय उमेदवाराच्या समर्थकांनी एकच जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला